वेंगुर्ल्यात समुद्री कासवाला कृत्रिम पाय, देशातील पहिलीच घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील समुद्रकिनाऱयावर सापडलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाला पृत्रिम पाय बसवून जीवदान देण्यात आले आहे. कोल्हापूर वन्यजीव वैद्यकीय विभागाने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. यासाठी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम (सिंधुदुर्ग) ने पाठपुरावा केला. विशेष म्हणजे समुद्री कासवाला पृत्रिम पाय बसविण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याची माहिती कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनिल गावडे (पिंगुळी) यांनी दिली.

गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंगुर्लेकर यांना 5 ऑगस्ट रोजी वेंगुर्ले समुद्रकिनाऱयावर सायंकाळच्या सुमारास ऑलिव्ह रिडले प्रजातीचा समुद्री कासव जाळय़ात अडकलेल्या स्थितीत आढळून आला होता. या कासवाच्या पायाला जाळे लागून एक पाय पूर्ण तुटलेला होता तर एक पाय लोंबकळत होता. या कासवाची ही अवस्था पाहून वेंगुर्लेकर यांनी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम (सिंधुदुर्ग)चे अध्यक्ष अनिल गावडे आणि स्थानिक वन विभागाला दिली. लागलीच अनिल गावडे व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत कासवाची जाळ्यातून यशस्वीपणे सुटका केली आणि नंतर तो कासव वन विभागाच्या मठ कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आला. गावडे, सचिव वैभव अमृस्कर आणि महेश राऊळ यांनी मठ कार्यालयाला भेट देत वनाधिकाऱयांशी चर्चा केली. गावडे यांनी कासवाची अवस्था बघून तत्काळ कोल्हापूर वन विभागाचे डॉ. संतोष वाळवेकर आणि वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना फोरमद्वारे याची माहिती दिली. वन क्षेत्रपाल शिंदे यांनीही कोल्हापूरचे डॉ. वाळवेकर यांच्याशी संपर्प साधून याबाबतची माहिती दिली. डॉ. वाळवेकर यांनी गावडे व शिंदे यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत या कासवाला उपचारासाठी कोल्हापूर येथे आणण्यास सांगितले. लगेच दुसऱयाच दिवशी या कासवाला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळवेकर व त्यांच्या टीमने या कासवावर उपचार सुरू केले. सुरुवातीला या कासवाची प्रपृती गंभीर होती. डॉ. वाळवेकर व सहकाऱयांनी कासवावर उपचार केल्यानंतर त्याची प्रपृती सुधारली. त्यानंतर या कासवाला पृत्रिम पाय बसविण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. या कासवाला खाण्यासाठी अधूनमधून संस्थेचे उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर मालवणहून मासे पाठवत होते. दरम्यान तीन महिन्यांनंतर हा कासव फिट झाला आहे. पाण्यात पोहूही लागला आहे. कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गच्या सहकार्याने कोल्हापूर येथील वन्यजीव वैद्यकीय विभागाच्या अधिकारी व त्यांच्या टीमने या कासवाला पृत्रिम पाय बसवून जीवदान दिले आहे. कासवाला पृत्रिम पाय बसविण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. या कामगिरीबद्दल कोल्हापूर वन्यजीव वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱयांचे सर्वत्र काwतुक होत आहे. वनाधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या कासवाला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनिल गावडे (पिंगुळी) यांनी दिली. दरम्यान कोल्हापूर वन्यजीव वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळवेकर यांनी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गच्या कार्याचेही कौतुक केले.