
राज्यपाल नियुक्त बारा जागांच्या नावाची यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
राजभवनावरील राज्यपालांच्या भेटीनंतर ही केवळ सदिच्छा भेट होती असा खुलासा चंद्रकात पाटील यांनी केला. कोरोना असल्याने दीर्घकाळ त्यांना भेटलो नव्हतो. राज्यपाल गोव्याला गेल्याने भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आता भेटलो. कोरोनाची परिसथिती काय आहे. कोरोना काळात भाजपाचे अनेक कार्यकर्ते मरण पावले त्यांच्या कुटुंबियांना मदतीबाबत काय उपाययोजना केल्या आदींबाबत त्यांनी चर्चा केली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.


























































