
देशभरात आज दीपोत्सव उत्साहात साजरा होत आहे. विदेशातही दिवाळीची झलक बघायला मिळत आहे. न्यूयॉर्क शहरातील गगनचुंबी ऐतिहासिक इमारत ’एम्पायर स्टेट’ भगव्या रोषणाईने न्हावून निघाली आहे.
न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कनेक्टिकट या त्रिराज्य प्रांतात असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनच्या ( एफआयए) पुढाकाराने मॅनहॅटन भवनात काल भगवी रोषणाई करण्यात आली. ’न्यूयॉर्क येथून शुभ दीपाकली!! आज आम्ही सर्व दिवे भगवे करून दीपोत्सव साजरा करत आहोत’, असे ट्विट एम्पायर स्टेट बिल्डिंगच्यावतीने करण्यात आले
.
दिवाळीच्या निमित्ताने फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने ’दिवाळी सूप अँड किचन’ हा अनोखा उपक्रम राबवला. याअंतर्गत न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कनेक्टिकट येथील 10 हजार नागरिकांना भोजन देण्यात आले. हिंदुस्थानी प्रथा- परंपरा, संस्कृती याचा जगाला परिचय व्हावा, हे यामागील उद्दीष्ट असल्याने एफआयएचे अध्यक्ष अंकुर कैद्य यांनी सांगितले.

























































