
राज्यात गेल्या चोवीस तासात 5 हजार 753 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा आता 17 लाखांच्या घरात पोहचला आहे. दरम्यान, आज दिवसभरात 4 हजार 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून दिवसभरात 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या चोवीस तासांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.75 टक्क्यांवर पोहचले असून मृत्यू दर 2.62 टक्के इतका आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 1 कोटी 2 लाख 13 हजार 26 जणांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 17 लाख 80 हजार 208 नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.
मुंबईत दिवसभरात 1135 कोरोना रुग्ण
मुंबईत आज दिवसभरात 1,135 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 618 जण कोरोनामुक्त झाले. मात्र विविध शारीरिक आजार असलेल्या 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईत 19 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 10 हजार 673 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एपूण संख्या 2 लाख 52 हजार 127 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 258 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 9 हजार 770 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 17 लाख 73 हजार 989 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 707 वर पोहोचली आहे.



























































