अकरम झाला अरविंद, हरयाणात प्रेयसीशी लग्न करण्यासाठी मुस्लिम तरुणाने स्विकारला हिंदू धर्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात लव जिहादवरून राजकारण सुरू असताना हरयाणात एका मुस्लिम तरुणाने आपल्या प्रेयसी सोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्विकारला आहे. तसेच आपले नाव अकरम ऐवजी अरविंद ठेवले आहे.

हरयाणात अकरम आणि निशा (बदलले नाव) चे एकमेकांवर प्रेम होते. परंतु दोघांच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. म्हणून 8 नोव्हेंबर रोजी दोघेही घरातून पळून गेले. निशाच्या कुटुंबीयांनी अकरमविरोधात मुलीचे अपहरण केल्याची तक्रार केली.

नंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. पोलिसांनी अक्रम आणि निशाने हिंदू पद्धतीने लग्न केल्याची माहिती कोर्टाला दिली. तसेच अक्रमने हिंदू धर्म स्विकारला असून स्वतःचे नामकरण अरविंद केल्याचेही पोलिसांनी कोर्टाला सांगितले. अरविंद आणि निशाने कोर्टाकडे सुरक्षेची मागणी केली. कोर्टाने ही मागणी मान्य करत नव दाम्पत्याला सुरक्षा देण्याचे आदेश पोलिसांना  दिले आहेत.