
आपण बाईक चालवित असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. देशभरातील वाढत्या अपघातांना आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने यापुढे बीआयएस मानांकित हेल्मेटची सक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहन आणि राजमार्ग मंत्रालयाने हेल्मेट फॉर राइडर्स ऑफ टू व्हीलर्स मोटर व्हेयिकल (क्वॉलिटी कंट्रोल) माध्यमातून एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे.
त्यात या नव्या नियमांची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार देशात यापुढे बीआयएस मानांकित हेल्मेटची विक्री आणि निर्मिती करणे बंधनकारक केले आहे. सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील हवामान लक्षात घेता हेल्मेटसाठी एक रोड सेफ्टीवर समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत एम्स रुग्णालयातील डॉक्टर आणि बीआयएसच्या अधिकाऱयांसह विविध तज्ञांचा समावेश करण्यात आला होता.




























































