Ind vs Aus – आज तिसरी टी-20 लढत, ऑस्ट्रेलिया लढणार प्रतिष्ठा राखण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करीत टी-20 मालिकात 2-0 अशा फरकाने खिशात घातली. आता विराट कोहलीची ब्रिगेड आज होणाऱया टी-20 लढतीत विजय मिळवून निर्भेळ यश मिळवण्यासाठी रेडी झाली असेलच. यजमान ऑस्ट्रेलियाला मात्र प्रतिष्ठा राखायची आहे. अखेरची लढत जिंकून कसोटी मालिकेआधी आत्मविश्वास संपादन करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ प्रयत्न करील.

या आकडेवारीवर एक नजर

– तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला दोन वेळा 3-0 अशा फरकाने हार सहन करावी लागली आहे.
– हिंदुस्थान व पाकिस्तान यांनी प्रत्येकी एक वेळा ऑस्ट्रेलियाला अशा फरकाने पराभूत केले आहे.
– हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसरा टी-20 सामना ऑस्ट्रेलियातील टेलिव्हिजनवर सर्वाधिक क्रिकेटप्रेमींनी पाहिला. याआधी हा विक्रम हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसऱया वन डे लढतीच्या नावावर होता.

बदल होण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियन संघात बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार अॅरोन फिंच संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. स्टीवन स्मिथला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी कसोटी मालिका बघता जोश हेझलवूडला तिसऱया टी-20 सामन्यात खेळवण्याची रिस्क ऑस्ट्रेलियन संघ घेणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजी विभाग युवा खेळाडूंवरच अवलंबून असणार आहे.

बुमराह, शमीला विश्रांती

हिंदुस्थानचा संघ आज होणाऱया लढतीत जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या दोन प्रमुख खेळाडूंना खेळवणार नाही. त्यांना कसोटी मालिकेसाठी फिट ठेवण्याचा प्रयत्न यावेळी केला जाईल. टी. नटराजन, शार्दुल ठापूर, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर या गोलंदाजांवरच टीम इंडियाच्या गोलंदाजीची मदार असणार आहे. शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, हार्दिक पांडय़ा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन हे फलंदाज म्हणून कायम असतील.

– या खेळपट्टीत दडलंय काय…

सिडनीच्या खेळपट्टीवर आतापर्यंत धावांचा पाऊस पडलाय. या खेळपट्टीमध्ये काही फरक पडणार नाही. मात्र येथील हवामानामध्ये फरक पडण्याची शक्यता आहे. वाऱयामुळे गोलंदाजी व फलंदाजी करताना काही योजनांमध्ये बदल करावा लागल्यास आश्चर्य वाटायला नको.