गगनयान योजनेलाही कोरोनाचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीने अवघ्या जगाला हादरून सोडले आहे. त्याचा फटका हिंदुस्थानच्या अंतराळात माणूस पाठवायच्या गगनयान मोहिमेलाही बसला आहे. त्यामुळे गगनयान योजना अमलात आणण्यासाठी हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो ) आणखी एक वर्षाचा विलंब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हिंदुस्थानी अंतराळवीरांना यानाने अंतराळात पाठवण्याची महत्त्वाकांक्षी योजना इस्रो डिसेंबर 2021 मध्ये अमलात आणणार होता, पण कोविड-19 महामारीने सर्वच क्षेत्रे काही महिने ठप्प केल्याने गगनयानाच्या सज्जतेत अनेक अडथळे आले आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीला आता किमान एक वर्ष विलंब होणार असल्याची माहिती इस्रो प्रमुख के. सिवान यांनी दिली आहे. गगनयानातून तीन हिंदुस्थानी अंतराळवीरांना पृथ्वीनजीकच्या वातावरणाच्या थराचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवणार आहे.