
फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये होणाऱया बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यास 15 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स शाखेचे विद्यार्थी नियमित परीक्षा शुल्कासह 4 जानेवारीपर्यत अर्ज करू शकतात. तर 5 जानेवारीपासून व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच पुनर्परीक्षार्थी आणि खासगी विद्यार्थी 5 ते 18 जानेवारीपर्यंत ऑनलाईन परीक्षा अर्ज भरू शकतात.
www.mahahsscboard.in ऑनलाईन अर्ज भरता येतील. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्युनियर कॉलेजमार्फतच परीक्षा अर्ज भरावेत, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.


























































