रत्नागिरी – चिपळूणात बनावट नोटांचा छापखाना, 85 लाखाच्या बनावट नोटा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूणात बनावट नोटांची छापाई करून त्या नोटा ठाण्यात घेऊन आलेल्या टोळीच्या म्होरक्याला ठाणे पोलिसांनी पकडल्यानंतर चिपळूणात बनावट नोटांची छपाई होत असल्याच्या वृत्ताने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.चौकशीनंतर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. त्यातिघांकडून 85 लाख 48 हजार रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

चिपळूण कळंबट येथील सचिन आगरे याने संगणक आणि प्रिंटरच्या सहाय्याने गावातच दोन हजार रूपयांच्या बनावट नोटांची छपाई सुरू केली.दोन हजारच्या बनावट नोटा वटविण्यासाठी सचिन आगरे ठाण्यात गेला होता.सचिन आगरेची हि खबर पोलिसांना लागली.ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 ने कापूरबावडी येथे सापळा रचून सचिन आगरे याला रंगेहाथ पकडले. चौकशीनंतर पोलिसांनी आगरेच्या मन्सूर खान आणि चंद्रकांत माने या दोघा साथीदारांना अटक केली.यातिघांकडून 85लाख 48 हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. हि खबर ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली.कारवाई गुन्हे शाखेचे आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत बनावट नोटा छपाई करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

बनावट नोटांचे धागेदोरे चिपळूण पर्यंत पोहचल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.स्कॅनर,प्रिंटर आणि संगणकाच्या सहाय्याने बोगस नोटा हुबेहुब बनविल्या जात असल्याने हा बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीने अजून कुठे ह्या बनावट नोटा वटविल्या आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.