
सोशल मीडियावर सध्या राजस्थानमधील भरतपूर जिह्यातल्या एका नवरीला देण्यात आलेल्या निरोपाची जोरदार चर्चा सुरू आहे. या नवरीची पाठवणी चक्क हेलिकाॅप्टरमधून करण्यात आली आहे. गावकऱयांच्या मते, आजूबाजूच्या गावातील कोणत्याच नवरीला इतक्या थाटामाटात निरोप देण्यात आला नाही. ही घटना आहे भरतपूर जिह्यातील छतरपूर गावातली.
आपले लग्न थाटामाटात व्हावे, आपली पाठवणी हेलिकाॅप्टरमधून व्हावी असे स्वप्न तेथील एका मुलीने पाहिले. तिची ही इच्छा तिच्या सासऱयांना कळली तेव्हा कसलाही विचार न करता तिला सरप्राईज द्यायचे ठरवले. मुलीच्या पाठवणीचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक गावात हेलिकाॅप्टर दाखल झाले. अन् हेलिकाॅप्टर पाहण्यासाठी गावकऱयांनी एकच गर्दी केली. हा सर्व खटाटोप आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी केला असल्याचे समजताच नवऱया मुलीलादेखील आश्चर्याचा धक्काच बसला. सर्व मंगल विधी पूर्ण झाल्यानंतर तिने आपल्या नवऱयासह सासरी जाण्यासाठी हेलिकाॅप्टरमधून उड्डाण घेतले. दोन्ही गावांतील प्रवास हेलिकाॅप्टरने पूर्ण करण्यासाठी जवळपास पाच लाख रुपये खर्च आला. सासऱयाने सुनेला दिलेल्या या सरप्राईज गिफ्टची सर्वत्र चर्चा आहे.

























































