विहिरीत पडलेल्या अंध गायीला जीवदान, मालवण येथील नागरिकांनी राबवली बचाव मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन्ही डोळ्यांनी अंध बनलेली एक गाय बुधवारी सकाळी मालवण शहरातील धुरीवाडा भागातील एका विहिरीत पडली. याबाबत नागरिकांना माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेत पाण्याने भरलेला विहिरीतून दोरखंडाना बांधून गायीला सुखरूप बाहेर काढले.

मंगळवारी रात्री उशिरा गाय विहिरीत पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी सकाळी याबाबत नागरिकांना माहिती मिळाली. नागरिकांनी एकत्र येत तात्काळ बचाव मोहीम सुरू केली.

काही नागरिक विहिरीत उतरले व गायीला दुखापत होणार नाही याची काळजी घेत गायीला दोरखंडांनी बांधले. त्यांनंतर गाईला विहिरीच्या बाहेर काढत तिला जीवदान देण्यात आले.