
सराव सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतरही पहिल्या कसोटीत संधी मिळालेल्या पृथ्वी शॉला संधीचे सोने करता आले नाही. तो पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या बॉलवर भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांनी पृथ्वीवर निशाणा साधला असून तो चांगलाच ट्रोल होत आहे.
“If he does have a chink in his armour it’s the ball which does come back into him…
“Quite often leaves a big gap between bat and pad and that’s where the Aussies will target.” @RickyPonting at his peerless best for the Prithvi Shaw wicket #AUSvIND pic.twitter.com/4nh67zBcpU
— 7Cricket (@7Cricket) December 17, 2020
पृथ्वी शॉच्या खेळावरून व फॉर्मवरून गेल्या काही दिवसात बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडत पृथ्वी शॉची कमजोरी जाहीररित्या बोलून दाखवली होती. ‘पृथ्वी शॉ त्याच्या बॅट व पॅडमध्ये जास्त अंतर ठेवतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्याला बाद करण्यासाठी तिथेच मारा करतील’, असे भाकित रिकी पाँटिंगने व्यक्त केले होते.
रिकीने आयपीएलदरम्यान केलेल्या या वक्तव्याचा अभ्यास करून ऑस्ट्रेलियन संघाने अशाच प्रकारे पृथ्वी शॉला बाद केले आहे. मिशेल स्टार्कने बॅट व पॅडच्या मध्ये बॉल टाकल्याने तो बॉल थेट वाट काढून मधल्या स्टंम्पवर आदळला.


























































