देशातील कोट्यवधी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला असला तरी दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. लॉकडाऊननंतरही देशातील एकूण रुग्णसंख्येने 1 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. यावरून कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोटय़वधी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटीवर तर जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी 21 दिवसांत कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा दावा केला होता. मात्र अनियोजित लॉकडाऊनमधून ते साध्य झाले नाही. पण देशातील कोटय़वधी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं, असे म्हणत राहुल गांधी यांनी लॉकडाऊनकरून मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.