
खगोल अभ्यासक, आकाश निरीक्षक आणि सर्वसामान्यांसाठी आजचा दिवस पर्वणीचाच होता. गुरू आणि शनी या दोन ग्रहांची महायुतीचा नजारा आज लाखो लोकांनी पाहिला.
तब्बल 400 वर्षांनंतर हा योग जुळून आला होता. त्यामुळे खगोलप्रेमींनी ही महायुती पाहण्यासाठी ठिकठिकाणी एकच गर्दी केली होती. काही क्षण ही युती झाल्यानंतर गुरुने शनीला मागे टाकले आणि तो पुढे निघून गेला.
































































