आसाममध्ये काँग्रेसला झटका, दोन आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील अनेक काँग्रेस आमदार बंडखोरीच्या पवित्र्यात असून भाजपमध्ये जाण्याची तयारी केली आहे.


आसाममध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तसेच भाजपमध्ये जाण्याची तयारीही दाखवली आहे. आसामचे भाजप प्रदेशाध्यक्ष रंजीर कुमार दास यांनी ही माहिती दिली आहे. दास म्हणाले की, पक्षाने एक कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीने निर्णय घेतल्यानंतर ३० डिसेंबरपूर्वी या आमदारांना पक्षात सामील केले जाईल.