
>> निळकंठ कुलकर्णी
रूपं यत्तप्राहुव्यक्तमाद्य ब्रह्मज्योतिर्गुणं निर्विकारम् ।
सत्तामात्रं निर्विशेष निरीहं स त्त्व साक्षाद्विष्णूरध्यात्मदीप: ।।१।।
नष्ट लोके द्विपरार्धावसाने महाभुतेवादिभुतं गतेषु ।
व्यक्तेsव्यक्त कालवेगेन याते भवानेक: शिष्यते शेषसंज्ञ: ।।२।।
योsयं कालस्तस्य तेsव्यक्तबन्धोश्वेष्टमाहुश्वेष्टते येन विश्वम् ।
निमेषादिवसरान्तो महीयांस्त त्वीशानं क्षेमधाम प्रपद्ये ।।३।।
मत्यो मृत्युव्यालभीत: पलान्सर्वल्लोकान्नीवृतिं नाध्यगच्छत ।
त्वत्प।दाबज्ज पाप्य यदच्छयाद्य स्वस्थ शेते मृत्यररस्म।दपैति ।।४।।
श्रीकृष्ण जन्म
जेव्हा अधर्म-अनीती ह्यांचा कडेलोट होतो, त्यावेळी भगवंत अवतार घेतो. त्यावेळीही तसंच झालं. मथुरेचा राजा कंस ह्याच्या अधर्म, अत्याचार, अनितीला प्रजा त्रासली. कंसाने काय केले नाही? त्याने आपली बहीण देवकी आणि तिचा पती वसुदेव ह्यांना बंदिशाळेत टाकले. का? तर तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा तुझा वध करील ही आकाशवाणी त्याने ऐकली होती. आपला शत्रू जन्मताच नाहीसा करायचा मारून टाकायचं, म्हणून कंसाने देवकीची बाळं मारून आपल्या माथी बालहत्येचं पाप घेतलं. बालकाची निर्घृण हत्या केली. तेव्हा देवकी पोटी आठव्या बालकाच्या रूपाने भगवान महाविष्णू ह्यांनी श्रीकृष्ण रुपाने आठवा अवतार घेतला.
भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरा बंदिशाळेमध्ये वसुदेव आणि देवकी याच्या पोटी भगवान श्रीकृष्ण यांनी जन्म घेतला. द्वापारयुगामध्ये भोजवंशी राजा उग्रसेन मथुरेमध्ये राज्य करत होता. त्याचा पुत्र कंस याने त्यांना सिंहासनावरून उतरवलं आणि स्वतः मथुरेचा राजा बनला. कंसाची बहीण देवकी तिचा विवाह वसुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत झाला. जेव्हा कंस आपल्या बहिणीला सासरी सोडायला जात होता, तेव्हा रस्त्यामध्ये एक आकाशवाणी झाली. ‘हे कंसा, ज्या देवकीला तू खूप प्रेमाने घेऊन जात आहे. तिच्या पोटातून उत्पन्न होणारे आठवे बालक तुझा वध करेल.’
हे ऐकून कंस वसुदेवला मारायला निघाला. तेव्हा देवकीने सांगितलं माझ्या पोटी येणारे बाळे तुझ्या समोर आणून ठेवीन. पण भावजीना मारून काय मिळणार आहे ? कंसाने देवकीच ऐकलं व पुन्हा मथुरेमध्ये निघून गेले. त्याने देवकी आणि वसुदेवाला बंदिशाळेमध्ये कैद केलं. देवकीला एक-एक करून सात बाळ जन्माला आली आणि सातही बाळ जन्माला येताच कंसाने ती मारली.
आठवं बाळ जन्माला येणार होतं. त्याच वेळी दुसरीकडे वृंदावनात नंद गोपाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती होती. वसुदेव आणि देवकी यांनी सात बाळं गमावली होती. त्यामुळे त्यांच्या वियोगाचं दुःख होऊन त्यांनी आठव्या बाळाला वाचवण्यासाठी, त्याची रक्षा करण्यासाठी त्यांनी एक उपाय केला. ज्या वेळी देवकी प्रसूत झाली त्यावेळी यशोदेच्या गर्भातून एक कन्या जन्माला आली. इथे मथुरेत ज्या बंदिशाळेमध्ये देवकी आणि वसुदेव कैदी होते, त्यामध्ये अचानक प्रकाश विस्तारला आणि समोर शंख,चक्र, गदा,पद्म धारण केलेले चतुर्भुज भगवान प्रकट झाले आणि दोघेही देवाच्या चरणाचे दर्शन घेतले. तेव्हा देवाने त्यांना सांगितलं ‘मी पुन्हा नवजात बाळाच रूप धारण करतो.’
तुम्ही मला यावेळी तुमचा मित्र नंद याच्या घरी वृंदावनामध्ये सोडून या आणि त्यांच्या घरी जी कन्या जन्माला आली तिला कंसाच्या हवाली करा. आताच वातावरण अनुकूल नाही आहे, तरी सुद्धा जे बंदिशाळेची संरक्षण करणारे सैनिक झोपतील आणि बंदिशाळेचे दरवाजे आपल्या आपणहून उघडतील आणि बाहेर उसळती यमुना तुम्हाला पार करण्यासाठी मार्ग देईल.
वसुदेव नवजात बाळाच्या रूपातील श्रीकृष्णाला टोपलीमध्ये ठेवून बंदिशाळेतुन बाहेर पडले आणि यमुना पार करून नंदाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी नवजात बाळाला यशोदाच्या बाजूला झोपवलं आणि कन्येला मथुराला घेऊन आले. मग बंदीशाळेचे दरवाजे जसे होते तसे बंद झाले .
तेव्हा कंसाला सूचना मिळाली की वसुदेव आणि देवकीला बाळ झालं आहे, त्याने बंदीशाळेत मध्ये जाऊन देकीच्या हातून नवजात कन्येला घेऊन जमिनीवर आपटायचं ठरवलं. परंतु कन्या आकाशामध्ये उडून गेली आणि म्हणाली ‘अरे मूर्खा मला मारून काय होणार आहे. तुला लवकरच तुझ्या पापांची शिक्षा दंड मिळेल. हे ऐकताच कंस क्रोधित होऊन चिंतेत पडला.
भगवान श्रीकृष्णाचे महात्म्य –
वसुदेव देवकी यांच्यापासून श्रीकृष्णाने जन्म घेतला. त्याचा जन्म केवळ धर्माचे रक्षण व अधर्म करणाऱ्याचा नायनाट करणे याचसाठी झाला होता. श्रीकृष्णांनी बाल्यावस्थेतच पूतना नामक राक्षसिणीच्या विषयुक्त स्तनांचा चावा घेऊन तिला ठार केले. शकट व यमलार्जुन यांना देखील ठार मारले. कालियानामक सर्पाचा नायनाट केला व धेनूकासुराचेदेखील हनन केले. संपूर्ण गोवर्धन पर्वतास हाताच्या करंगळीवर तोलून श्रीकृष्णांनी व्रजनगरीस इंद्राच्या कोपापासून वाचविले होते. स्वतः इंद्रदेखील त्यांना मानीत असे. बालवयातच त्यांनी केशी दैत्याचा वध केला व गोपगोपींना भयमुक्त केले.
मथुरेत गेल्यावर श्रीकृष्णांनी चाणूर व मुष्टीक नावाच्या मल्लाना जमिनीवर लोळविले व कंस राजाची शेंडी हातात पकडून त्यास आसनावरून खाली पाडून ठार केले. श्रीकृष्णास रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी इत्यादी आठ पट्टराण्या होत्या व आणखी एकंदर सोळा हजार एकशे पत्नी होत्या. त्यांना 80 पुत्र आणि 1 कन्या अशी अपत्यं होती. रुक्मिणीस प्रद्युम्न नावाचा पुत्र होता ज्याने पुढे त्याने शबराचा वध केला.
श्रीकृष्णाचे गुरू सांदिपनी ऋषी होते. कृष्णाने सर्व विद्या आपल्या गुरूकडून आत्मसात केल्या व गुरुदक्षिणा म्हणून गुरूच्या आज्ञेनुसार आपल्याच पुत्रास मारून त्यांना अर्पण केला, तेव्हा मुनींनी त्यास जिवंत केले व कृष्णास आपला पुत्र परत मिळाला.
मथुरेत उग्रसेनास कृष्णाने परत राजा केले व देवांचे पूर्ण पालन केले. आपला परमभक्त व मित्र अर्जुन त्याच्या व त्याच्या बंधुंच्या मदतीला धावून कौरवांचा महायुद्धात नि:पात घडवून पांडवांना हस्तिनापूरचे साम्राज्य मिळवून दिले.



























































