साईचरणी 14 दिवसांत 3 कोटी 24 लाखांचे दान अर्पण, अडीच लाख भाविकांनी घेतले दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साईबाबांच्या शिर्डीत सलग सुट्यांमुळे देशाच्या विविध भागातून गर्दी झाली आहे. गेल्या 14 दिवसांत दिवसात कोरोनाच्या संकटातही फिजिकल डिस्टन्सिंग पाळत सुमारे 2 लाख पन्नास हज़ार भाविकांनी साईंच्या चरणी माथा टेकवला. भाविकांनी साईबाबांच्या झोळीत तब्बल 3 कोटी 23 लाख 98 हज़ार 208 रूपयांचे विक्रमी दान अर्पण केले आहे.

लॉकडाऊननंतर प्रदीर्घ काळानंतर साईमंदीर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी परिश्रम घेवून कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना मंदिर परिसरात केल्या. दरम्यान, 15 डिसेंबर ते 28डिसेंबर या काळातील14 दिवसात साईबाबा मंदीरात तब्बल अडीच लाख भाविका साईंच्या चरणी नतमस्तक झाले. साईसंस्थानकडून आलेल्या सुरक्षेविषयक उपाययोजनांबद्दल भाविकांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर राहणार खुले

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डी येथे साई दरबारी येऊन नववर्षाची सुरुवात करतात. या काळात वाढती गर्दी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षापासून साई मंदिर नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येते. यंदाही मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्या या निर्णयामुळे साईभक्तांना दिलासा मिळाला आहे. साई मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याने 31 डिसेंबरची शेजारती आणि 1 जानेवारी रोजी काकड आरती रद्द करण्यात आल्याचे संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.