बांबूपासून तयार केली ई-सायकल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांबू आणि कार्बन फायबरचा वापर करून ईकोफ्रेंडली सायकलची निर्मिती अहमदाबादमधील लाईटस्पीड मोबॅलिटी या कंपनीने केली आहे. बांबूची असे या सायकलचे नाव आहे. या सायकलची फ्रेम बांबू आणि कार्बन फायबरपासून तयार केली आहे, जे स्टीलच्या तुलनेत वजनाने हलके असते. त्यामुळे या सायकलचे वजन इतर सायकलच्या तुलनेत खूपच कमी म्हणजे केवळ 15 किलो एवढे आहे. या सायकलमध्ये पोर्टेबल लिथियम आर्यन बॅटरी बसविण्यात आली आहे. जी सिंगल चार्जमध्ये 70 किमी चालते. याशिवाय आणखी पाच मॉडेल्स कंपनीने तयार केले आहेत.