
कोरोनामुळे जीवनशैलीत खूप बदल घडून आलेत. घराबाहेर पडताना आपल्याला मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळेच महिलांचे लिपस्टिक लावणे कमी झाले आहे. परिणामी एका अहवालानुसार लिपस्टिकची विक्री 28 टक्के घटली आहे. त्याचवेळी डोळ्यांचा मेकअप, केसांचा रंग आणि नेलपेंटच्या विक्रीत 200 टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात महिला घरात होत्या. घरातूनच काम करत होत्या. त्यामुळे मेकअप करणे, लिपस्टिक लावणे कमी झाले होते. कोरोनाने वर्प फ्रॉम होमचा नवा ट्रेंड आणला आहे. ग्लोबल वर्कफोर्स अॅनालिटिक्सच्या सर्व्हेनुसार, 2021 च्या अखेरपर्यंत 25 ते 30 टक्के लोक आठवडय़ांतील काही दिवस घरून काम करतील.
























































