महाविकास आघाडीच्या वर्षभरातील कामाचा लेखाजोखा पुस्तकरूपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळाने गेल्या वर्षभरात घेतलेल्या सर्व निर्णयाची एकसंध मांडणी ‘आपले सरकार ठाकरे सरकार’ या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. विधानपरिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.

सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी कोरोनाच्या महासंकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने ही लढाई खंबीरपणे लढली. महाविकास आघाडीने घेतलेल्या लोकोपयोगी कामाची माहिती या पुस्तिकेत आहे. उद्योगक्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे काम वर्षभरात झाले आहे. कोरोनाकाळात घेतलेल्या सर्व निर्णयप्रकिया तसेच जनतेसाठी उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांचीही माहिती या पुस्तकात आहे. यावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती होती.