
मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी एका आरोपीला लूटमारीच्या आरोपाखाली अटक केली. पण आरोपीने आपल्या मित्रांसोबत एका तरुणीचा सामुहिक बलात्कार केल्याची कबुली दिली. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा समोर आला आहे.
मध्य प्रदेशमध्ये सागर जिल्ह्यात एक 18 वर्षीय तरुणी आपल्या जवळच्या नातेवाईकासोबत डोंगरावरील देवाच्या मंदिरात गेले होते. येताना या दोघांना दोन चोरांनी अडवले. त्यांच्याकडून चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम लुटली. इतकेच नाही तर आरोपींनी तरुणीसोबत असलेल्या मुलाला मारहाण केली आणि तरुणीवर सामुहिक बलात्कार केला आणि तेथून पळ काढला.
नंतर पीडित तरुणीने पोलिसांत फक्त लूटमारीची तक्रार दाखल केली. आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिने सांगितलेच नाही. जेव्हा पोलिसांनी आरोपींना पकडले तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी या प्रकरणी गोपाल पटेल आणि मोहित पटेल या दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.




























































