क्लिनिकल ट्रायलदरम्यान लस दिलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

मध्य प्रदेशमध्ये क्लिनिकल ट्रायलदरम्यान कोव्हॅक्सिन लस दिलेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 42 वर्षीय तरुणाला लस दिल्यानंतर दहा दिवसांनी त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान लस दिल्यांनतर विषबाधा झाल्याने संबंधिताचा मृत्यू झाल्याचा संशय सरकारी आधिकाऱयांकडून व्यक्त केला जात असला तरी मृत्यूचे खरे कारण व्हिसेरा तपासणीतूनच समोर येईल असे क्लिनिकल ट्रायल घेणाऱया रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

भारत बायोटेकच्या लसीची क्लिनिकल ट्रायल भोपाळमधील पीपल्स मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल या खासगी रूगणालयात सुरू आहे. त्यानुसार दीपक मारवाई या स्वयंसेवकाला 12 डिसेंबर रोजी लस देण्यात आली हाती. त्यानंतर दोन दिवसांपासून त्याला अस्वस्थ वाटू लागले.

मात्र दोन दिवसांत सर्व ठीक होईल सांगत डॉक्टरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मारवाईच्या कुटुंबीयांना केला आहे. तसेच त्याची तब्येत बिघडल्यानंतर रूग्णालयात घेऊन जात असतानाचा त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र नियमानुसार कारवाईला सात-आठ दिवस दिवस देखरेखीखाली ठेवले होते, असे ट्रायल घेणाऱया रुग्णालयाचे व्हाईस चान्सलर डॉ. राजेश कपूर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, क्लिनिकल ट्रायलसाठी दीपक मारवाईकडून कोणतेही कन्सेन्ट घेतले नव्हते, ना त्याच्या सहभागाबाबतची कोणतीही कागदपत्र दिली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या रचना धिंग्रा यांनी केला आहे.