
सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ खूप आवडीने बघितले जातात. हे व्हिडियो खूप वेगळे, अगदी मन जिंकणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे हत्ती आणि श्वानाच्या मैत्रीचा व्हिडिओ. तो बघून दोस्त असावा तर असा, अशी प्रतिक्रिया नेटिजन्स देत आहेत.
In case your timeline needs more dogs and elephants pic.twitter.com/PaKHWhTU2S
— David Leavitt (@David_Leavitt) January 15, 2021
खरं तर श्वान हत्तीच्या जवळ जायला मागत नाही. आणि तो जवळ गेलाच, तर काही हत्ती त्याला सोडणार नाही. पण व्हिडिओत हे दोघे चक्क एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. हत्ती सोंडेने लाकडाचा तुकडा फेकत आहे. श्वान तो घेऊन परत हत्तीला देत आहे. दोघांमधले बाँडिंग जबरदस्त आहे. ते नुसतं बघत राहावंसं वाटतंय. व्हिडिओवर सोशल मीडियावर जबरदस्त कमेंट येत आहेत. अनेकांनी ‘अद्भुत’ म्हणून या दृश्याचे कौतुक केले आहे तर काहींनी या हत्ती-श्वानाच्या जोडीवर प्रेम जडल्याचं म्हटले आहे.




























































