
फ्लिपकार्टने सुपरकॉईन पे सादर करून सुपरकॉईन रिवॉर्ड्स प्रोग्रामला बळकटी दिली आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून फ्लिपकार्ट देशातील 5000 हून अधिक रिटेल आऊटलेट्ससोबत भागीदारी करणार आहे. ग्राहकांना येथे सुपरकॉईन्सच्या माध्यमातून पेमेंट करता येईल आणि त्यामुळे त्यांना अधिक पर्याय आणि मूल्य मिळू शकेल. सुपरकॉईन हा फ्लिपकार्टचा अनोखा रिवॉर्ड्स प्रोग्राम आहे. आपल्या व्यासपीठावर खरेदी करणाऱ्या लाखो ग्राहकांना रिवॉर्ड आणि लाभ देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. ग्राहकांना फक्त सुपरकॉईन्सचा वापर करून बिलाची 100 टक्के रक्कमही देता येईल.



























































