पगार न मिळाल्याने चालकाने पाच लक्झरी बसेस जाळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पगार न मिळाल्याने चालकानेच पाच लक्झरी बस जाळल्याची घटना समोर आली आहे. अजय रासर असे त्या चालकाचे नाव असून त्याला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या आठवडय़ात पहाटे तीनच्या सुमारास तक्रारदारांच्या मालकीच्या तीन लक्झरी बसेसला आग लागली होती. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक पोपट येळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघचौरे, कदम, शिंदे, शिरसाट यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी अजयला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर अजयने लक्झरीला आग लावल्याचे पोलिसांना सांगितले.