अंबरनाथ बदलापूर दरम्यान रुळ टाकताना एका मजुराचा मृत्यू, दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज पहाटे अंबरनाथ बदलापूर दरम्यान रुळ टाकताना एका मजुराचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सकाळी डाऊन मार्गाची वाहतूकही ठप्प झाली होती.

आज पहाटे अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान रूळ टाकण्याचे काम सुरू होते. रुळ टाकण्याच्या मशीनीचा अपघात झाला. या अपघात एका कंत्राटी मजूरा मृत्यू झाला असून दोन मजूर जखमी झाले आहेत. यावेळी डाऊन मार्गावरील सेवा ठप्प झाली होती. नंतर सकाळी 9.40 च्या सुमारास रेल्वेसेवा पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.