
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्टस् ऍकॅडमीतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 13 ते 23 फेब्रुवारीदरम्यान आंतर हॉस्पिटल टी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा बाद पध्दतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रंगणार आहे. पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्यांना रोख पुरस्कारासह आत्माराम मोरे स्मृती चषकाने गौरविण्यात येईल.
आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तसेच प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूस विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संघटन समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.00 वा. सदर स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात येईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हॉस्पिटल क्रिकेट संघांनी प्रवेश अर्जासाठी संघटन समितीचे सहसचिव ओमकार चव्हाण, मनोहर पाटेकर (81693 55610) यांच्याकडे संपर्क साधावा.


























































