
अमित शहा यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार जावे असे वक्तव्य करणाऱया भाजपच्या नारायण राणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सणसणीत टोला हाणला आहे.
नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत, पण ते असे विनोद करतात हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे केवळ विनोद म्हणूनच पाहावे. राणेंच्या वक्तव्याकडे त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.






























































