
मोटारीला धडकल्यामुळे दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 8 फेब्रुवारीला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वानवडीतील सिक्रेट हार्ट टाऊन सोसायटी समोर घडला.
इलायजा सूर्यकांत भोसले (वय 30) असे जखमी झालेल्य तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक डॉ. करुणा कांबळे (रा. एच बिल्डिंग, सिक्रेट हार्ट टाऊन, वानवडी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अविनाश हरिदास रेडके यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
करुणा कांबळे डॉक्टर असून 8 फेब्रुवारीला मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्या मोटारीतून घरी जात होत्या. त्यावेळी सिक्रेट हार्ट टाऊन सोसायटीच्या जवळ आल्यानंतर वळण घेत असतानाच इलायजा भोसले मोटारीच्या दरवाजाला धडकून रस्त्यावर पाडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.































































