पुण्यात बिबवेवाडीत पुन्हा तोडफोड, तीन रिक्षांच्या काचा फोडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिबेवाडी परिसरातील सुपर शिवतेज मित्र मंडळ जवळ पार्क करण्यात आलेल्या 3 रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. दोन दिवसांपुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास तीन मुलांनी रिक्षांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी मोहम्मद अफजल फारूक अन्सारी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी लोखंडी हत्याराने रस्त्याच्या बाजूला पार्क असलेल्या तीन रिक्षांच्या काचा फोडल्या.

हातामधील लोखंडी हत्यार हवेत फिरवून ‘माझ्या भावाला कोणी मारहाण केली त्याच्याकडे बघून घेतो’ असे म्हणून परिसरात आरडाओरडा करत भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.