
देवेंद्र भगत
स्वच्छ, सुंदर, कचरामुक्त मुंबईसाठी पालिका अनेक उपाययोजना करीत असताना आता ‘कंपोस्ट बिन्स’ हा अत्याधुनिक उपक्रम राबवत आहे. मुंबईत पहिल्यांदाच ‘डी’ वॉर्डमध्ये हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली असून ‘राजभवन’, ‘सह्याद्री अतिथीगृह’ आणि वॉर्ड ऑफिससह काही सोसायटय़ांमध्ये असे ‘कंपोस्ट बिन्स’ ठेवण्यात आले आहेत. कंपोस्ट खताच्या इतर प्रकल्पांसाठी दहा ते पंधरा लाखांचा खर्च येत असताना एक बिन्समध्ये केवळ 10 हजार रुपयांत सूक्ष्मजिवांच्या सहाय्याने कंपोस्ट खत तयार होणार असल्याचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायटय़ांना कचऱयाचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱया इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱयाच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापन मोठय़ा प्रमाणावर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने कचऱयाचे वर्गीकरण, ओल्या कचऱयापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱयाची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंवा पर्जन्य जल संधारण योजना राबवणाऱया सोसायटय़ा-आस्थापनांना करात सूट देण्यात येत आहे.
यामध्ये उगमस्थानी ओल्या कचऱयापासून खतनिर्मिती आणि सुक्या कचऱयाचे वर्गीकरण यासाठी मालमत्ता करामधील सर्वसाधारण करात 10 टक्के सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कचऱयाचे प्रमाण कमी करताना ‘कंपोस्ट बिन्स’ हा उपक्रम ‘डी’ वॉर्डमध्ये ग्रॅण्ट रोड विभागात राबवण्यास सुरुवात केली आहे. ‘कंपोस्ट बिन्स’मध्ये 100 किलो ओल्या कचऱयापासून खत बनवले जाईल. सोसायटय़ांमध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी जनजागृती आणि प्रोत्साहन दिले जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
कचऱ्याचे प्रमाण घटतेय
ग्रॅण्ट रोडमध्ये दररोज 230 मेट्रिक टन कचरा तयार होत होता. मात्र पालिकेच्या माध्यमातून कचरा कमी करण्यासाठी केल्या जाणाऱया उपाययोजनांमुळे दैनंदिन कचऱयाचे प्रमाण आता 204 मेट्रिक टनांवर आले आहे.
सुक्या कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी ताडदेव येथे प्रकल्प आहे. या ठिकाणी सुक्या कचऱयाचे विभाजन खासगी संस्थेच्या माध्यमातून करून प्रक्रियेसाठी गुजरातला नेला जातो. विभागात दिवसाला 10 ते 15 मेट्रिक टन सुका कचरा निर्माण होतो.
दरम्यान, पालिकेने केलेल्या उपायोजनांमुळे मुंबईतील कचऱयाचे प्रमाण 8 हजार मेट्रिक टनांकरून सहा हजार ते 6300 मेट्रिक टनांकर आले आहे. कोकिड काळात हे प्रमाण 5400 ते 5700 मेट्रिक टनांकर आले आहे.































































