कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे पुणे शहरात आजपासून 31 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परभणी, अकोले आणि जळगावातही आज रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज तातडीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी सौरव राव यांनी रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली. 31 मार्चपर्यंत पुणे शहर रात्री 11 ते पहाटे 6 या कालावधीत ‘लॉक’ राहणार आहे.
पुण्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन केंद्र सरकारशी संपर्प साधणार आहे. सध्या रोज सुमारे 22500 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. ती संख्या एक लाखापर्यंत वाढवण्यासाठी पेंद्राची मदत मागितली जाणार आहे.
परभणी, अकोले, जळगाव सोमवारपर्यंत बंद
परभणी आणि अकोला जिह्यात आज रात्रीपासून सोमवारी पहाटे 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. जळगावातही सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लावला गेला आहे. कर्फ्यूच्या काळात अत्यावश्यक सेवांना मात्र परवानगी देण्यात आली आहे.
संभाजीनगरात विकेंड लॉकडाऊन
संभाजीनगरमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू असून वीकेंडच्या दिवशी म्हणजेच शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, लग्नाचे हॉल पूर्णपणे बंद राहणार आहेत.
- बाजार, हॉटेले, मॉल्स, थिएटरना रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी
- रात्री 11 वाजेपर्यंतच ऑनलाइन डिलिव्हरी करता येणार
- शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद
शुक्रवारची रुग्णसंख्या
राज्य
- रुग्ण 15,817
- मृत्यू 56
मुंबई
- रुग्ण 1,646
- मृत्यू 4































































