शिल्पा शेट्टीचा नवा लूक; उन्हाळ्यासाठी परफेक्ट ड्रेस असल्याची चर्चा, इतकी आहे किंमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिल्पा शेट्टीचा फिटनेस हा नेहमीच सर्वांसाठी चर्चेचा विषय असतो. तिच्यासारखं फिट रहावं असं प्रत्येकाला वाटतं, सोशल मीडियाद्वारे ती फिटनेस व योगाबद्दल मार्गदर्शन करत असते. चाहते देखील तिच्या व्हिडीओंना भरभरून प्रतिसाद देतात. या व्हिडीओ शिवाय तिच्या वेगवेगळ्या लुक्ससाठी देखील ती तेवढीच प्रसिद्ध आहे . ट्रॅडीशनल आउटफिट ग्लॅमरस अंदाजात परिधान करणं तिला निश्चितच चांगलं जमतं. वयाच्या 45 व्या वर्षी सुद्धा ती खूप तरूण दिसते यावरूनच तिच्या फिटनेसचा अंदाज लावू शकतो.

अलीकडेच शिल्पाने लाल रंगाच्या मॅक्सी मध्ये फोटो शेअर केले आहेत. ह्या कॅजुअल लूकमध्ये शिल्पा फारच सुदंर दिसत आहे. ह्या ड्रेसबाबत बोलायच झालं तर, लाल रंगावर पांढऱ्या रंगाची बांधणीची प्रिंट खूप उठून दिसते. ह्या ड्रेसला कॅजुअल लूक देण्यासाठी शिल्पाने त्यावर तपकिरी लेदर बेल्ट लावला आहे, ड्रेसला आकर्षक लूक देण्यासाठी ट्रांसपरंट हिल्स घातले आहेत.

तसेच, विंटेज् पद्धतीचे दागिने, आणि अॅक्सेसरीज् मध्ये सिल्वर व सोनेरी हँडकफ ब्रेसलेट घातले आहेत. हा ड्रेस शिल्पाने इंडियन फॅशन डिजायनर अमृत कौर लेबल ‘Ank Amrit’ या स्टायलिशने निवडला आहे. जर तुमचे मन या लाल रंगाच्या ड्रेसकडे आकर्षित झाले असेल तर आपल्याला स्टाईल समर फॅशन वॉर्डरोबचा भाग बनविण्यासाठी 25000 रुपये खर्च करावे लागतील.