कुछ तो गडबड है… ‘पीएमओ’तून दुसरी एक्झीट; मोदींच्या सल्लागाराचा तडकाफडकी राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी. के. सिन्हा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांतील ‘पीएमओ’तील ही दुसरी एक्झिट आहे. त्यामुळे कुछ तो गडबड हैं, ‘पीएमओ’मध्ये सर्वकाही आलबेल नाही, अशी चर्चा दिल्लीतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

वैयक्तिक कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे पी. के. सिन्हा यांनी म्हटले असले, तरी राजीनाम्यामागचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यापूर्वी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कार्यालयातील मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनीही असाच तडकाफडकी राजीनामा दिला होता.

  • मूळचे बिहारचे असलेले सिन्हा यांनी दिल्लीत अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1977च्या बॅचचे ते उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.
  • उत्तर प्रदेशात आणि केंद्रात महत्त्वाच्या विविध मंत्रालयांत कामाचा त्यांचा दिर्घ अनुभव आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात त्यांनी तीन मंत्रालयांचे सचिव म्हणून काम केले.
  • ऊर्जा, शिपिंग मंत्रालयाचे ते सचिव होते. पेट्रोलियम आणि वाय मंत्रालयाचे ते विशेष सचिव होते.
  • 2015 मध्ये सिन्हा यांची कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती केली. 30 ऑगस्ट 2019 पर्यंत ते या पदावर होते. 11 सप्टेंबर 2019 पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सल्लागार होते.
  • मुख्य सल्लागार असतानाही सिन्हा यांना कॅबिनेटचा दर्जा दिला गेला नव्हता. त्यामुळे ते नाराज होते.
  • सिन्हा यांची दिल्ली किंवा पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.