पालिकेच्या आणखी एका अभियंत्याला अटक, एसीबीची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घर दुरुस्तीच्या कामाच्या परवानगीसाठी 15 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून चौदा हजारांची लाच घेताना पालिकेचे कनिष्ठ अभियंता अविनाश इंगुळकर, अमोल लोखंडे आणि मदन नौबत या तिघांना एसीबीने अटक केली. एकाच वेळेस तिघांना एसीबीने अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या काकाचे कुर्ल्यात घर आहे. त्यांनी घर दुरुस्तीसाठी पालिकेच्या एल वॉर्डमधील इमारत-कारखाने विभागात अर्ज केला होता. तेव्हा नौबत यांनी त्याच्या घरी भेट देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार 12 मार्चला नौबत हे तक्रारदाराच्या घरी गेले होते. तेथे नौबत यांनी घर दुरुस्तीच्या परवानगीसाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.