
मी नंदिग्राममधून नक्कीच जिंकणार, इथे माझाच विजय पक्का आहे. मला याबाबत कसलीही चिंता नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला दुसऱया मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा सल्ला देऊ नये, असा पलटवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला.
मोदींनी गुरुवारी प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जींवर टीका केली होती. त्यांनी नंदिग्राममधून पराभव मान्य केला आहे, अशा शब्दांत मोदींनी डिवचले. त्यांच्या टीकेवर ममतांनी शुक्रवारी कुचबिहारच्या सभेत पलटवार केला. मी काही तुमच्या पक्षाची सदस्य नाही, तुम्ही मला दुसऱया मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा सल्ला द्यावा. मी नंदिग्राममधून निवडणूक लढवली आहे व इथूनच जिंकणार, असे खणखणीत प्रत्युत्तर ममतांनी दिले.




























































