
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी शोधण्यासाठी फिरणाऱया नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने महत्त्वाची माहिती पाठवली आहे. त्यातून मंगळ ग्रहावर पाण्याचे पुरावे मिळाले आहेत. मंगळावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध होते. ग्रहावरील दगडांच्या रचनेतून पाणी असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नासाचा रोव्हर मंगळावरील गेल क्रेटर भागात असलेल्या मोठय़ा दगडावर फिरत आहे. या रोव्हरने दिलेल्या डेटानुसार वैज्ञानिकांनी असं अनुमान काढलंय की, शंभर फूट धुळीने बनलेल्या लाल ग्रहावर म्हणजेच मंगळावरील दगडांच्या रचनेत बदल दिसून येतात. ओली माती आणि त्यावर वाळूची रचना आहे. वादळामुळे या रचनेच्या जागेत बदल होतो.
मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळत आहेत. तिथे ओली माती दिसून आली. त्याप्रमाणे दमट वातावरण असू शकते. गेल क्रेटरच्या आतमध्ये पाणी भरले असल्याची शक्यता आहे. नासाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची आशा आहे. क्युरिओसिटी रोव्हरने याआधी मंगळ ग्रहाचा व्हिडीओ पाठवला होता. त्यामध्ये मंगळावरील वादळांचे चित्रण होते.



























































