माझा फोन टॅप झालाय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका ऑडिओ टेपच्या सहाय्याने ज्यामध्ये कूचबिहार गोळीबार झालेल्या पीडितांसह रॅलीचा प्रस्ताव ठेवला असल्याची बाब समोर आली आहेत. ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपला फोन कोणत्याही कल्पनेशिवाय टॅप केल्याचा आरोप केला असून त्याबाबत सीआयडी चौकशीचे आदेश देणार असल्याचे सांगितले.

भाजप या षड्यंत्रात सहभागी असल्याचे त्या निवडणूक रॅलीच्या वेळी बोलल्या. तसेच सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचा विकास कार्यक्रमांवर प्रचार जुळत नसून भाजप नेते आमच्या दैनंदिन संभाषणावरही डोकावत असल्याचे त्या म्हणाल्या.

यासंदर्भात आपण सीआयडीच्या चौकशीचा आदेश देणार असून अशा चोरीछुपेपणे केलेल्या पह्न टॅपिंगमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही मी सोडणार नाही. तसेच यामागील खरा सूत्रधार कोण आहे हे मला आधीच कळले आहे, असेही मममा बॅनर्जी म्हणाल्या.

बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, ‘काही एजंटांसमवेत काही व्यक्तींनी अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभाग नोंदवला असल्याची माहिती आपल्याकडे आहे.’ भाजप जरी आपण यामागे नसल्याचे सांगत असले तरी तरी हे स्पष्ट झाले आहे की भाजप त्यामागे आहे, असेही त्या म्हणाल्या.