
कोरोनाची एकामागोमाग एक लाट येत आहे. याचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसत आहे. टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. जपानमध्येही कोरोना वाढत आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण आयोजक टोकियो ऑलिम्पिक आयोजनासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. परदेशी क्रीडाप्रेमींनी टोकियो ऑलिम्पिकसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. पण स्थानिक प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एण्ट्री द्यायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या जून महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.



























































