
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन उद्या (शुक्रवारी) होणारा चैत्रीवारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. एकादशीचे औचित्य साधून करण्यात येणारे धार्मिक विधी समितीच्या वतीने पार पाडले जाणार आहेत. वारीची परंपरा खंडित होऊ नये यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात वारीचा सोहळा साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात कडक नाकाबंदी केली असून, भाविकांनी स्नानासाठी आणि दर्शनासाठी गर्दी करु नये, असे आवाहन मंदिर समिती आणि पोलिसांनी केले आहे.



























































