
ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या 24 कोरोना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन बुधवारी 14 पुरुष आणि 10 महिला रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णालयात महापालिकेने टायोनिपॉन या पुण्यातील पंपनीकडून ऑक्सिजन टाकी उभारून घेतली. देखभाल-दुरुस्तीचे दहा वर्षांचे कामही याच पंपनीला दिले होते. ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भादंवि 304 अ नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.























































