भांडणाच्या रागातून मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉल खेळताना झालेल्या भांडणाचा राग काढत तरूणाला बेसबॉलच्या स्टीकसह हॉकी स्टीकने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी हडपसरमधील डीपी रोडवरील लाल मातीच्या मैदानात घडला. याप्रकरणी प्रज्वल चित्रानंद जानकी (20) आणि रजनीकांत बाबुराव कांबळे (25, दोघेही हडपसर रा.) यांना अटक करण्यात आली आहे. तुषार कोरडे ( 21, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी दोघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तुषार आणि त्याचे मित्र निलेश कोरडे लाल मातीच्या मैदानात फुटबॉल खेळत होते. दरम्यान, शुक्रवारी तुषारचा मित्र आर्यन कुंभार याची एका मुलासोबत भांडण झाले होते. त्या भांडणातून संतापलेल्या आरोपींनी आर्यन कुंभार व निलेश कोरडे यांना हॉकी स्टीकने मारहाण केली. तुषारला बेसबॉल स्टिकने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी हडपसर पोलिस तपास करीत आहेत.