‘जाने किधर ले जाए’ माझ्यासाठी स्पेशल! ललित पंडीत यांचे पहिलेवहिले सिंगल भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाण्याचे खरे सौंदर्य साधेपणात आहे. हाच साधेपणा आजवर मी माझ्या गाण्यांतून जपलाय. इतक्या वर्षांच्या प्रवासात गायलेली सगळीच गाणी माझ्या हृदयाजवळची आहेत. परंतु ‘जाने किधर ले जाए’ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण हे गाणं म्हणजे माझ्या जीवनाची, नवीन प्रवासाची सुरुवात असल्याचे गायक-संगीत दिग्दर्शक ललित पंडीत यांनी सांगितले.

जतीन-ललित या जोडीने आजवर बॉलीवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. या संगीतकार जोडीमधील ललित पंडीत यांचे पहिलेवहिले सिंगल ‘जाने किधर ले जाए’ हे नुकतेच यू-टय़ूबवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ललित पंडीत हेच या गाण्याचे गायक-संगीतकार आहेत. साधेपणाने आणि मधुर स्वर यामुळे हे गाणे श्रोत्यांना पुनःपुन्हा ऐकावेसे वाटेल असे ते सांगतात. पुढे ते म्हणाले, संगीत दिग्दर्शक या नात्याने इतकी वर्षे मी हिंदीसह इतर भाषांतील चित्रपटांना संगीत दिले आहे. परंतु आता चित्रपटांच्या गाण्यापेक्षा वेगळी गाणी, संगीत बनवण्याचा आणि ती गाण्याचा आस्वाद मुक्तपणे घेतोय.