
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी अनेक राज्यांनी सक्त निर्णय घेत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पुढील 15 दिवसांसाठी पुन्हा लॉकडाऊन वाढवला आहे. आता केरळमध्ये वीकेंड लॉकडाऊन तर पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात प्रत्येक दुसरा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या मिनी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यानुसार थिएटर, हॉटेल्स, बार, जिम, स्विमिंग पूल बंद राहणार आहेत. तसेच सामाजिक धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. आता बाजारही सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 3 ते 5 दरम्यान सुरू होणार आहे. राज्यात होम डिलिव्हरीला मुभा देण्यात आली आहे. केरळमध्ये शनिवारी रविवार वगळता उर्वरित पाच दिवस सर्व सुरू असणार आहे.

























































