
सध्याच्या काळात आपल्या सर्वाना घरातच बसावे लागले आहे. शालेय विद्यार्थी तर दीड वर्षापासून घरातच आहेत. त्यांना शाळेचा, मधल्या सुट्टीचा, वर्गाच्या फावल्या वेळात धमाल मस्ती करण्याचा आनंद घेता येत नाही, पण प्रबोधन कुर्ला शाळा आणि पल्लवी फाउैंडेशनने आयोजित केलेले धमाल एक्स्प्रेस ऑनलाइन उन्हाळी शिबीर मुलांना आनंद देणारे ठरेल, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
संस्था अध्यक्ष भाऊ कोरगांवकर यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाला खासदार राऊत यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या आणि पुढील वर्षी सर्वजण एकत्र येऊन ‘धम्माल मस्ती’ करू असेही विद्यार्थ्यांना सांगितले.
आपली लोककला, संस्कृती विसरू नका
प्रसिद्ध कोरिओग्राफर व मंगल गाणी दंगलगाणी, मंथन व आवाज की दुनिया फेम सुभाष नकाशे यांनी मार्गदर्शन केले. नृत्य क्षेत्रात करीयर करू इच्छिणाऱया तसेच याची आवड असलेल्या मुलांनी देशी-विदेशी नृत्यप्रकार जाणून घेण्याचा जरूर प्रयत्न करावा, पण आपली लोककला, आपली संस्कृती विसरू नये. आपल्या देशातील नृत्यकला शिकून त्याचे शास्त्राrय शिक्षण घेऊन आपली संस्कृती मोठी करावी. त्यातून ही कला जगभरात पोहोचेल आणि त्यातून आपण व आपली कला मोठी होईल. नृत्यकलेचे शास्त्राrय शिक्षण आपला ताल, लय, अभिनय पक्की करेल आणि मग आपणास कोणताही डान्स फॉर्म आत्मसात करून घेणे सोपे होऊन जाईल. अशा प्रकारचे मार्गदर्शन सुभाष नकाशे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेदेखील दिली. नेहा मनुचारी आणि संदीप कदम यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.


























































