दगड मारल्याचा विचारला जाब, दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दगड मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरूणाचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्य़ा तिघांना पोलिसांनी अटक केली. शनिवारी दुपारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आंबेगाव खुर्द परिसरात घडली.

सुमीत अहिवळे, अक्षय अंदारे, नीलेश शिंदे अशी अटक केलेल्या  आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी केतन नरळे  यांनी तक्रार दिली आहे. केतन वंदना दुध डेअरीसमोर साफ सफाई करीत असताना आरोपी अक्षय कंदारे याने दगड मारला होता. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी केतनला जीवे ठार मारण्याच्या हेतूने गळा दाबला. त्यानंतर केतनचा मावसभाऊ शंकर शिंदे यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.