धारावीत दिवसभरात 7 रुग्ण सापडले, रुग्णसंख्येत कमालीची घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी वाढवण्यात आलेल्या कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर देण्यात आलेली भर यामुळे गेल्या काही दिवसांत धारावीतील रुग्णसंख्या कमालीची घटली असून मंगळवारी दिवसभरात 7 रुग्ण सापडले. सक्रिय रुग्णांची संख्याही एक हजारवरून 72 वर आली आहे. धारावीप्रमाणेच दादरमध्येही रुग्णसंख्या घटली असून मंगळवारी दिवसभरात 15 रुग्ण तर माहीममध्ये 14 रुग्ण सापडले. दादरमध्ये सध्या 225 सक्रिय रुग्ण आहेत तर माहीममध्ये 264 रुग्ण आहेत.