‘क्रीडा समालोचक’ म्हणून करिअर करणाऱयांसाठी स्पोर्ट्सनशाची कार्यशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पोर्ट्सनशाच्या वतीने ‘मी क्रीडा समालोचक होणार’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा 10 ते 13 जून या कालावधीत संध्याकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत पार पडणार आहे.

या कार्यशाळेत स्टार, दूरदर्शन, आकाशवाणी यांसारख्या इतर वाहिन्यांवर समालोचक म्हणून काम करणारे पंकज आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उत्कृष्ठ रिडिंग मटेरिअल, इंटर ऑक्टिव्ह सेशन, समालोचनाच्या सर्व बाबींवर मार्गदर्शन, समालोचनामधून मिळणाऱया संधी, प्रमाणपत्र या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा या कार्यशाळेत समावेश असणार आहे. या कार्यशाळेमध्ये मुले, मुली, पुरुष, स्त्रीया सर्वांना रजिस्टर करता येणार आहे.

या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी इच्छुकांना 9821893665/9869852213 या व्हॉट्सअॅप नंबरवर रजिस्टर करावे लागणार आहे. या कार्यशाळेची फी एक हजार रुपये आहे. रजिस्टर करून फी भरल्यानंतर आपल्या ई-मेल किंवा व्हॉट्सअॅप नंबरवर मीटिंगची लिंक पाठवण्यात येईल. फी भरण्यासाठी शिरीष देशपांडे (9869852213, गुगल पे) व राजेश देव (9821893665, पेटीएम) या क्रमांकावर संपर्क साधावा.