
शहरातील बाजारपेठा आणि विडी व यंत्रमाग कारखाने तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी जाणाऱ्य़ा ‘सीटू’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांची पोलीस मुख्यालयात रवानगी केली.
वास्तविक शांततेत सुरू असलेले धरणे आंदोलन दडपून टाकणे योग्य आहे का, याबाबत 24 तासांत निर्णय जाहीर न केल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला.
सेंटर ऑफ इंडियन्सच्या वतीने विडी व यंत्रमाग कारखाने आणि बाजारपेठा तातडीने सुरू करा, या मागणीसाठी आज ‘सीटू’चे राज्य महासचिक कॉ. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील पदाधिकारी, महिला विडी कामगार आणि कार्यकर्ते कोरोनाचे नियम पाळून शांततेत आंदोलन सुरू होते. यावेळी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलिसांनी आंदोलकांना घेराव घालून बळाचा कापर करीत आंदोलकांना ताब्यात घेतले.
कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीटू’चे राज्य महासचिक कॉ. एम. एच. शेख, माकपच्या नगरसेकिका कामिनीताई आडम, माजी नगरसेकिका नसीमा शेख, सुनंदा बल्ला आदींचे शिष्टमंडळ आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटले. यावेळी याबाबत 24 तासांत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.























































